सासवड नगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढली? सासवड नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगरसेवकांची संख्या ४ ने तर स्वीकृत नगरसेवकांची संख्येत १ ने ...
सासवड नगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढली?
सासवड नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगरसेवकांची संख्या ४ ने तर स्वीकृत नगरसेवकांची संख्येत १ ने वाढ होणार ?
लेखक- प्रा.एन.आर.जगताप / मुख्य संपादक चावडी न्युज
राज्य शासनाने जारी केलेल्या नवीन घोषणा आणि अध्यादेशानुसार महाराष्ट्र राज्यातील महापालिका व नगर परिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे हीच चर्चा सासवड नगरपालिके संदर्भात देखील आहे. सासवड नगरपालिके मध्ये सध्य:स्थितीत नगराध्यक्षांसह जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या १९ असून यासोबतच २ नगरसेवक हे स्वीकृत म्हणून घेतलेले आहेत.म्हणजेच सध्या सासवड नगर परिषदेमध्ये एकुण सदस्य संख्या २२ आहे.सासवड नगरपालिकेतील नगर सेवकांची संख्या वाढली? ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय महापालिका नगर परिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढणार
राज्य सरकारने जाहीर केलेल्या साधारण १५ % सदस्य वाढीच्या घोषणेनुसार आता सासवड नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या देखील वाढण्याची दाट शक्यता आहे. नवीन आदेशानुसार सासवड नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या ही ४ ने वाढणार असल्याची हि आता राजकीय विश्लेषक, अभ्यासक, व राजकीय नेत्यांनी शक्यता वर्तवली आहे.Facebook चे नाव बदलले,मार्क झुकेरबर्ग यांची घोषणा
जर जनतेमधून निवडून येणार्या नगरसेवकांची संख्या चार निवडली तर जनतेतून निवडून येणार्या नगरसेवकांची संख्या ही आता १९ वरून २३ होईल तर स्वीकृत नगरसेवकांची संख्याही २ ऐवजी ३ होणार होऊ शकते यामुळे सासवड नगरपालिकेत जर जनतेमधून नगराध्यक्षांची निवड झाली तर नगराध्यक्षांसह जनतेतील नगरसेवक व स्वीकृत नगरसेवक अशी एकूण संख्या ही २७ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सासवड नगरपालिकेची नगरसेवकांची संख्या वाढल्याने आता प्रभागांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे. सध्या सासवड नगरपालिकेमध्ये ९ प्रभाग आहेत राज्यशासनाने सुरुवातीला एक सदस्य प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे प्रभाग रचना होण्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र आता बघू सदस्य पद्धतीमुळे प्रभागरचना हीच राहणार आहे त्यामुळे आता सासवड नगरपालिकेत सध्या प्रभाग आहे चार नगरसेवकांचा संख्या वाढल्याने प्रभागांचे संख्यादेखील २ ने वाढू शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे सासवड नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक इच्छुक आजी-माजी भावी नगरसेवकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत आता मी नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे एकंदरीतच यामुळे नव्या चेहऱ्यांना व तरुणांना देखील संधी मिळण्याची आशा आहे त्याच प्रमाणे नाराज उमेदवारांचं समाधान करण्यासाठी स्वीकृत सदस्यांची संख्या देखील एकने वाढणार आहे एकंदरितच आता सासवड नगरपरिषद येथील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नगरसेवकांची संख्या वाढणं हे एका अर्थाने सासवडकर यांच्या दृष्टीने फायद्याचाच मानला जात आहे कारण प्रतिनिधींचा म्हणजेच नगरसेवकांचा प्रमाण वाढणं हे त्या त्या प्रभागाच्या विकासासाठी नागरिकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे नगरपरिषदेला त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी व नगरपालिका व नागरिक यांचा मधला दुवा म्हणून नगरसेवकाला काम करण्याची अधिक संधी उपलब्ध होणार आहे एकंदरीतच विस्तारित होणाऱ्या सासवड शहराच्या विकासासाठी सासवडच्या नगरसेवकांची वाढती संख्या हे प्रगतीचे द्योतक म्हटलं जाऊ शकतं याबाबतीत अजून कोणत्याही प्रकारचे अधिकृत सरकारी आदेश नगरपालिकेला प्राप्त झालेले नसले तरीदेखील प्राथमिक स्वरूपात असा अंदाज वर्तवला जातोय की आता सासवड नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या ही १९ वर वरून २३ होऊन स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही २ वरून ३ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या ना-याने सासवड नगरपालिका राजकारणात नवीन ट्वीस्ट
थोडक्यात नगराध्यक्ष आगामी सासवड नगरपालिका निवडणूकीत नगराध्यक्ष हे जनतेतून निवडले गेले तर नगराध्यक्षांसह,सासवड नगरपालिकेची जनतेतील नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक यासह एकूण सदस्य संख्या ही २७ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबतीत अधिकृत आदेश आल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणारच आहे . पुरंदर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या चिंताजनक
COMMENTS